Breaking News

मेहेर इंग्लिश स्कूलला ‘सॅनिटरी नॅपकिन्स पॅड वेंडिंग’ भेट

अहमदनगर/प्रतिनिधी
अखिल भारतीय माहेश्‍वरी महिला संघटनाच्या ‘समाधान एक पहल’ कार्यक्रमांतर्गत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचे भारतासह नेपाळमध्ये वितरण करण्यात आल्या. ‘आंतरराष्ट्रीय मासिक धर्म स्वछता व जागरूकता’ दिनी 1625 मशीन वेगवेगळ्या ठिकाणी बसवून एक विश्‍व रेकॉर्ड केले.
सावेडी येथील रानाज वेलनेस सेंटरतर्फे मेहेर इंग्लिश स्कुलला सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन भेट देण्यात आली. याप्रसंगी हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा, मेहेर इंग्लिश स्कुलचे चेअरमन जगदीश झालानी, ‘दादा चौधरी’चे मुख्याध्यापक संजय मुदगल, ‘रानाज वेलनेस सेंटर’च्या संचालिका डॉ. श्यामा मंत्री, मेहेर इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी, सीमा दरेकर, स्वाती मुदगल, सोनाली शिंदे, भावना गायकवाड, मनीषा शिंदे, वैशाली देवतरसे, शकुंतला भंडारी, उषा भालेराव, भारती खांडेकर आदींसह शिक्षक व कर्मचारीवृंद उपस्थित होते.                                                                
डॉ.श्यामा मंत्री म्हणाल्या, “हा उपक्रम नगर शहरात पहिल्यांदाच राबवण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिन्स पॅड वेंडिंग मशीनद्वारे 5 रुपयात नॅपकिन्स उपलब्ध होणार आहे. या मशिनचा महिला व मुलींसाठी उपयुक्त ठरणारआहे.’’
हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. 
सूत्रसंचालन वैशाली देवतरसे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी यांनी मानले.