Breaking News

बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी

 संगमनेर/प्रतिनिधी
 संगमनेर तालुक्यातील प्रतापुर शिवारात भरवस्तीत घुसून बिबट्याने घराबाहेर बसलेल्या इसमावर हल्ला करुन जखमी केले आहे. यामुळे परीसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. परीसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
 प्रतापुर येथील प्रवरा डाव्या कालव्या लगतच्या आंधळे वस्तीवरील भाउसाहेब नानासाहेब आंधळे हे बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा खंडीत झाला असल्याने घराबाहेर बसलेले असतांना पाठीमागून अचानक बिबट्याने हाल्ला करुन डोक्याला चावा घेऊन गंभीर जखमी केले. या वेळी आंधळे यांनी आरडाओरड केल्याने बिबट्या तेथून पसार झाला. जखमी भाउसाहेब आंधळे यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे हालविले. या घटनेने परीसरात खळबळ उडाली आहे. या परिसरात तातडीने पिंजरा लावण्याची मागणी भगवान राव ईलग, गंगाधर आधळे, सोहील आंधळे, बबन आंधळे, सुभाष बोन्द्रे यांनी केली आहे.