Breaking News

किम जोंगने जनरलला टाकले पिराना माशांच्या टँकमध्ये

मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी उचलले क्रूरतेची सीमा गाठणारे पाऊल


प्योंगयांग
उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोग उन हा आपल्या कारनाम्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. आता त्याचे क्रूरतेचे आणखी एख उदाहरण जगासमोर आले आहे. त्याने आपल्या जनरलला पिराना माशांच्या टँकमध्ये टाकून मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे. किमला त्याच्या प्रामाणिक असण्यावर संशय आल्याने त्याने जनरलला अशाप्रकारे क्रूर पद्धतीने मृत्यूदंडाची शिक्षा दिली. ब्रिटनमधील ‘डेली स्टार’ या वृत्तपत्राने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

किमने आपल्या प्योंगयांग येथील राँगसाँग या निवासस्थानी एक तलाव तयार केला आहे. त्यामध्ये त्याने पिराना मासे पाळले आहे. आपल्याविरोधात कट रचल्याचा संशय आल्याने त्याने जनरलचे हात शरीरापासून वेगळे केले आणि त्याला पिराना मासे असलेल्या तलावात फेकल्याचे वृत्त डेली स्टारने दिले आहे. त्याने आपल्या घरात ठेवण्यासाठी ब्राझीलवरून हे पिराना मासे मागवले होते. किम जोंगच्या कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे.
दरम्यान, जनरलचा मृत्यू हा पिराना माशांमुळे झाला आहे किंवा नाही याबाबत पुष्टी करण्यात आली नाही. त्याने आपल्या निवासस्थानी असा तलाव तयार करण्याची कल्पना जेम्स बाँडच्या एका चित्रपटातून घेतली आहे. 1965 साली प्रदर्शित झालेल्या यू ओनली लिव्ह ट्वाईस या चित्रपटात अशाच प्रकारचे एक दृश्य दाखवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतल्या आपल्या दूतांसह पाच अधिकार्‍यांची त्याने निर्दयीपणे हत्या केली.