Breaking News

मांडवे बु. येथे मुळा नदीवर बंधार्‍यासाठी सर्व्हे फोटो

संगमनेर/प्रतिनिधी
  पठार भागातील मांडवे बु.येथे मुळा नदीवर केटीवेअर बांधण्यासाठी पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, मिराताई शेटे, इंद्रजित खेमनर, किरण मिंडे यांनी या बंधार्‍यासाठी जागेची पाहणी केली. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यात सिमेंट बंधार्‍यांचे जाळे निर्माण केले. शक्य असेल तेथे कोल्हापूरी, दगडी बंधारे बांधण्यात आले आहेत. त्या अनुषंगानेच हे काम चालू आहे अशी माहिती  पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे यांनी दिली.

  यावेळी अरगडे म्हणाले कि,मांडवे बु.येथील ग्रामस्थांची मुळा नदीवर केटीवेअर बांधण्याची मागणी होती.यामुळे पंचायत समितीच्या मासिक बैठकीत या भागातील सदस्यांनी या केटीवेअर बांधणीचा ठराव मांडला. त्यामुळे या बंधार्‍यासाठी जागेची पाहणी तात्काळ अधिकार्‍यांसह करण्यात आली. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली येथे लवकरात लवकर केटीवेअर बांधण्यात येणार असून याचा लाभ मांडवे व परिसरातील शेतकर्‍यांना होणार आहे.