Breaking News

पावसाळी अधिवेश संपण्यापूर्वी ‘साकळाई’ संदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय बैठक घ्यावी ; बबनराव पाचपुते यांची मागणी

श्रीगोंदे/प्रतिनिधी
 साकळाईचा प्रश्‍न सोडविण्यासाठी फडणवीस सरकार सकारात्मक भूमिकेत आहे. सध्या सुरू असलेले पावसाळी अधिवेश संपण्यापूर्वी साकळाई संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रशासकीय बैठक घ्यावी, अशी मागणी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केली आहे.
 आषाढी वारीत असलेल्या पाचपुते यांनी गुरुवारी (दि.27) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धावती भेट घेतली. या संदर्भात माहिती देताना पाचपुते म्हणाले की, काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री यांनी नगर येथे येऊन शेतकर्‍यांना याबाबत शब्द दिला होता. साकळाई योजनेची इच्छापूर्ती फडणवीस सरकारच करेल असा शेतकर्‍यांना विश्‍वास आहे. अधिवेश संपण्यापूर्वी या बाबत मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे उपसभापती विजयराव औटी, नगरचे पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे व संबंधित अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घ्यावी. त्याला जोडूनच डिंभेच्या बोगद्याचा विषय यामध्ये घेण्यात यावा अशी विनंती पाचपुते यांनी केली. त्यावर लवकरच बैठक घेण्याचे आश्‍वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.