Breaking News

नांदगावचा पुढील आमदार शिवसेनेचा असेल : उद्धव ठाकरे

मनमाड/प्रतिनिधी
महाराष्ट्र अस्मानी संकट दुष्काळ परिस्थितीमुळे राज्यात शेतकर्‍यांच्या प्रश्‍न जाणून घेण्यासाठी आले आहे.विमा कंपनी जर केल्म दिला नाहीतर आम्ही मुंबईत विमा कंपनीच्या कार्यालयात चालू देणार नाही. जुनी शिवसेना दाखवु देऊ, दुष्काळावर आम्ही राजकारण करत नाही,असा स्पष्ट शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कृषी कंपन्याना खणखणीत इशारा दिला आहे. शिवसेनेने सर्व केलेल्या पीकविमा मदत केद्रांची पाहणी करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नांदगाव मध्ये आले होते. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधत असतांना पीक विमा कंपन्याना हा इशारा दिला आहे.
विमा कंपन्यांनी गोरगरीब शेतकर्‍यांना नाडत योजनेमध्ये घोळ निर्माण केला आहे. हा घोळ आता उघडकीस यायला सुरुवात झाली आहे. याबाबत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, मोठमोठ्या विमा कंपन्यांच्या दलालांनी देशभरातील शेतकर्‍यांच्या हक्काचे पैसे गोळा केले. ज्यावेळी नुकसान भरपाई देण्याची वेळ आली तेव्हा ते दिसत नाही. तुमची कार्यालये मुंबईत आहेत, जर महाराष्ट्रातल्या शेतकर्‍याला नडाल तर तुमची मुंबईतली ऑफिसेस बंद करून टाकल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही.असा इशाराही त्यांनी दिला. नांदगाव चा पुढील आमदार शिवसेनेच्या असेल मागील निवडणूक पेक्षा चार पटीने मताधिक्याने निवडून द्या ही साद घातली किती जणांना कर्जमाफी झाली किती जणांना पीक विमा भरपाई मिळाली ही विचारांनी केली।देशात सरकार हवे म्हणून आम्ही वैयक्तिक सुख दुःख बाजूला ठेवली  शेतकर्‍यांना त्रास देणार्‍या विमा कंपनी चे दुकाने बंद करू,शिवसेना भाजपच्या युती घट्ट आहे.ज्या शेतकर्‍यांनी अर्ज सादर केली घोषणा केली म्हणजे मदत मिळते असे नाही असे निर्देशनात आले आहे.  सरकारच्या योजना घराघरात पोहचविण्यासाठी शिवसेना काम करेल, राज्यात प्रत्येक गावात मदत केंद्र सुरू करणार येत्या
8/10 दिवसात काही निर्णय नाही झाला तर, शेतकर्‍यांना घेऊन आम्ही पंतप्रधान कडे जाऊ आमच्या शक्ती साठी तुमची साथ महत्वाची आहे. शिवसेनेचे जेष्ठनेते बापूसाहेब कवडे- शेतकर्‍यांना सरसगत कर्जमाफी द्यावी, नांदगाव विधासभेची जागा शिवसेनेस सोडावी आम्ही ही जागा मोठ्या मतधिक्यन जिंकू अशी ग्वाही दिली. बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे,-कर्जमाफी मर्यादा दीड लाख पर्यंत शिवशेनामुळे झाली जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात असतो तेव्हा शिवसेना शेतकर्‍यांच्या सोबत आहे, संजय राऊत- नांदगाव करण्याचा योग असा की उद्धव साहेब पाऊस घेऊन आले.शिवसेनानी चारा छावण्या सुरू केल्या आहेत. नांदगावचा पुढील आमदार शिवसेनेच्या असेल, मातीचा गधं हा शिवसेना चा गंध आहे.
यावेळी व्यासपीठावर रविंद्र मिर्लेकर, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे,भाऊसाहेब चौधरी,मिलिंद नार्वेकर खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा  शितल सांगळे, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, विजय करंजकर, माजी जि. प. उपाध्यक्ष मधुकर हिरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तेज कवडे, विलास आहेर, पंचायत समिती गटनेते  सुभाष कुटे,आदी उपस्थित होते. याप्रसंगी भाऊसाहेब हिरे, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, गँगाधर बिडगर संभाजी पवार, तालुकाध्यक्ष सुनील जाधव, सुनील जाधव, सागर हिरे, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, गुलाब भाबड, मनमाड नगरपालिका नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, नगराध्यक्ष, राजेश कवडे व नगरसेवक, नांदगाव व मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, संचालक नाशिक जिल्ह्यसंपर्क प्रमुख अरविंद नाईक मालेगाव शिवसेना महानगर प्रमुख रामा मिस्तरी नांदगाव पंचायत समितीच्या सभापती विद्या पाटील,तालुकाध्यक्ष किरण देवरे, विष्णू निकम, संभाजी पवार, राजाभाऊ आहिरे, जि प सदस्य रमेश बोरसे,शहराध्यक्ष सुनील जाधव,सागर हिरे, नांदगाव तालुक्यातील शेतकरी, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.