Breaking News

जबाबदारी दिल्यास प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याची तयारी : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर
पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती पार पाडण्यास माझी नेहमीच तयारी असते, असे सुचक वक्तव्य महसूल, कृषी व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
शेंडा पार्कातील कृषी संशोधन केंद्राच्या आवारात उभारण्यात येणार्‍या ‘शेतकरी सन्मान भवन’ इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज पार पडले. यावेळी ते बोलत होते.
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी पाटील यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने त्यांच्या जागी नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. निवडणुकीतील विजयासाठी भाजपला आता प्रदेशाध्यक्ष म्हणून नावाजलेल्या चेहर्‍याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच चेहरे घेऊन महाराष्ट्रात भाजप विधानसभा निवडणुकीला सामोरे जाईल. पक्षयंत्रणा कार्यरत ठेवण्याची जबाबादारी नव्या प्रदेशाध्यक्षाला पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे विविध संघटनात्मक जबाबदार्‍या पार पाडलेल्या व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपद मिळू शकेल.