Breaking News

श्रीमंत व्यक्तीने एकदा तरी हजयात्रा करावी : इनामदार

अहमदनगर/प्रतिनिधी
“ज्या मुस्लीम बांधवांकडे आपला प्रपंच व व्यवहार सांभाळून हज यात्रेएवढे पैसे शिल्लक असतील तर त्या इसमाने आयुष्यात एकदा तरी हजयात्रा केली पाहिजे, इस्लामच्या पाच तत्वापैकी हजयात्रा हे एक आहे. त्यासाठी प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने हज यात्रेस जाण्याची मनात इच्छा धरावी’’, असे इनामदार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक जाकीर इनामदार यांनी सांगितले.
शकील चौधरी रिश्ते-नाते ट्रस्टतर्फे जाकीर इनामदार व त्यांच्या पत्नी कमरजबीन हे यावर्षी हज यात्रेसाठी जात असल्याने त्यांचा ट्रस्टचे अध्यक्ष शेख खलील यासीन चौधरी यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी इनामदार बोलत होते.
याप्रसंगी मुमताज चौधरी, अकील चौधरी, सोहेल चौधरी, आकीब चौधरी आदि उपस्थित होते.