Breaking News

शाळेवरील पत्रे वादळाने उडाले; सुट्टीमुळे टळला अनथ

जामखेड/ता. प्रतिनिधी :
काल (सोमवार) सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने जामखेड शहरातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेवरील सहा वर्गांवरचे पत्रे उडून गेल्याची घटना घडली. परंतु सध्या शाळेला  सुट्टी  असल्याने शाळेत विद्यार्थी उपस्थित नव्हते. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. लवकरच शाळा सुरू होणार असून शाळेत शिकत आसलेले विद्यार्थी कोठे बसवायचे हाच प्रश्न शिक्षकांना   पडला आहे. शहरातील मध्यवर्ती भागात 774 विद्यार्थींची सख्या आसलेली सर्वात मोठी मुला-मुलींची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेचे स्थापना 1958 मध्ये झाली आहे.  साठ वर्षे पूर्ण झालेल्या शाळेचे पत्रे, भिंती जिर्ण होऊन भिंतीना अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. परीणामी शाळा धोकादायक परीस्थितीती आहे त्यामुळे येथील विद्यार्थी जीव मुठीत  घेऊन शिक्षण घेत आहेत.
अशाच परीस्थितीत काल सोमवार दि 10 रोजी सायंकाळी जामखेड शहरात जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुलींची या शाळेतील सहा  वर्ग खोल्यांचे पत्रे उडून गेल्याने मोठ्या शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही पत्रे शाळेतील झाडांवर जाऊन पडल्याने झाडांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच  शाळेतील पुस्तके, तक्ते, एल ए डी टी व्ही, फॅन सह शालेय साहीत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी  रूपचंद जगताप, प.स.चे सभापती सुभाष आव्हाड, केंद्र प्रमुख निळकंठ घायतडक, डॉ भगवान मुरुमकर व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी भेट दिली. धोकादायक शाळेबाबत  शाळेच्या मुख्याध्यापकांनी सदर शाळेबाबत शाळेची इमारत निर्लिखीत झाली आसल्याचे लेखी तक्रार शिक्षण विभागाकडे केली आहे. या पूर्वी शाळेतील मुख्याध्यापकांनी दहा वर्षापूर्वी  नविन वर्गखोल्यांची मागणी केली होती. त्यावेळी तात्कालीन आसलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी रुबल गुप्ता यांनी शाळेस प्रत्यक्ष भेट देऊन दहा वर्ग खोल्या मंजूर करण्यात  आल्या होत्या. मात्र शाळेची मागिल जागा ही वादात आडकल्याने शाळेचा आलेला मंजूर निधी देखील परत गेला.