Breaking News

पन्हाळसाठे पिंपळखुटे तिसरे ग्रुप ग्रामपंचायत च्या सरपंच पदी धनराज पालवे

येवला 
तालुक्यातील पन्हाळसाठे- पिंपळखुटे तिसरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची अटीतटीची लढत झाली सरपंच पदी धनराज बबनराव पालवे हे  निवडून आले
मंगळवारी (दि.११)सकाळी 11 वाजता पन्हाळसाठे येथील ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ए बी गायके यांच्या अधिपत्याखाली सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली या ग्रामपंचायतीत एकूण नऊ सदस्य आहेत 9 पैकी पाच सदस्य पालवे यांच्या बाजूने राहिले त्यामुळे ते निवडून आले बबनराव पालवे चांगदेव पालवे संजय घुगे संतोष पालवे पर्वत घुगे माधव नारायण सानप यांच्या नेतृत्वाखाली सदर निवडणूक लढविण्यात आली होती यावेळी सरपंच धनराज पालवे उपसरपंच सुवर्णा प्रदीप गांगुर्डे सदस्य बाबा बाई पर्वत घुगे परिगाबाई माधव सानप सोनाली बबन मोरे आदि पाच सदस्यांनी मतदान केले उर्वरित चार सदस्य गैरहजर राहिले या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागून होते अखेर निवडणूक सुरळीत पार पडली या निवडणुकीसाठी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कोंडीलवार यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता निवडणुकीनंतर समर्थकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.ग्रामसेविका जे वाय हटकर,तलाठी सुलाने, तसेच रमेश पालवे. रायभान भुरे,गोरख पालवे,प्रदीप गांगुर्डे, शशीकांत बालवीर, अनिल मुंडे, राजाराम पाटील सुरेश मुंडे आदी पालवे समर्थकांसह ग्रामस्थ उपस्थित होते