Breaking News

भांबरे शैक्षणिक संस्थेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कोळगाव/प्रतिनिधी
  आनंद  ग्रामविकास प्रतिष्ठान रुईछत्तीसी संचलित मातोश्री भागूबाई भांबरे कृषी व विज्ञान ज्युनियर कॉलेज, साई आनंद इंग्लिश मीडियम स्कूल व आनंद व्यायाम शाळा या शैक्षणीक संस्थेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
  रुईछत्तीसी येथील मातोश्री भागूबाई भांबरे कृषी व विज्ञान ज्युनियर कॉलेजचा इ.12 वी विज्ञानचा निकाल शंभर टक्के लागला आहे. 6 विद्यार्थ्यानां ऊच्च शिक्षणासाठी प्रतिवर्षी 80 हजार रुपये शासकीय स्कॉलरशिप मंजूर झाली आहे. आनंद इंग्लिश मीडियम स्कूलचे 7 विद्यार्थी इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत आले आहेत. तर आनंद व्यायाम शाळेच्या मल्लांनी राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर ऊत्कृष्ट कामगिरी केली आहे. या सर्व गुणवंत  विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांचा तसेच परीसरातील हातोळण, लोणी, पिंपळा, मांडवा, दहीगाव, रुई, गुणवडी, राळेगण, मांडवगण, रुईखेल आदी शाळांमध्ये इयत्ता दहावी परिक्षेत प्रथम क्रमांक मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचा संस्थेच्यावतीने मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.