Breaking News

अतिक्रमण हटाव साठी नागरिकांचे नगरपरिषद समोर उपोषण

अंबेजोगाई । प्रतिनिधीः-
शहरातील हमाल गल्ली ,ढोर गल्ली ,चांभार गल्ली या तीन भागातील प्रमुख नागरिकानी  नगरपरिषदेच्या व महादेव मंदिराच्या जागेवर होत असलेले अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी नागरिक नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे
सदरील अतिक्रमणाचा वाद अनेक वर्षापासून सुरू असून नगरपरिषद प्रशासन बोटचेपे धोरण स्वीकारत असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे नगर परिषद प्रशासनाला या अगोदर अनेक वेळा निवेदने, तक्रारी दिल्या मात्र आजपर्यंत नागरिकांना न्याय मिळालेला नाही नगर परिषदेसमोर नागरिक उपोषणाला बसल्याचे समजताच सीओ कार्यालयाकडे फिरकले नाहीत उपोषणकर्त्यांनी आम्हाला ठोस निर्णय पाहिजे असा निर्धार प्रशासनाला  कळवला असल्यामुळे उद्या तहसीलदार व नगर परिषदेचे सीओ यांच्या उपस्थित तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन  करण्यात आले आहे नगरपरिषदे समोर उपोषणाला बसणार्‍यामध्ये धनंजय मासाळ ,विजय कुरणे, विलास मासाळ, शंकर हुलगुंडे ,पांडुरंग मासाळ, गोपाळ मासाळ, रजनीकांत हुलगुंडे आदींचा समावेश आहे