Breaking News

गोदा नदीपात्रात वाळूतस्करांवर कारवाई ; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर/प्रतिनिधी
पुणतांबा (ता. राहाता) येथील गोदावरी नदीपात्रात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. कारवाईमध्ये पोलिसांनी दोन ट्रॅक्टर चालकांसह १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी दोन ट्रॅक्टर मालकांसह अन्य दोघे पसार झाले.

याबाबत जालिंदर मुरलीधर मुळीक यांनी राहाता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. छबू एडू कसबे (वय २७), योगेश सुखदेव साळुंके (पुरणगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) असे पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. ट्रॅक्टर मालक नंदूराव ठोंबरे, दत्त ठोंबरे यांच्यासह मिथुन ठोंबरे, अनिल तुवर पसार झाले. नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पुणतांबा येथील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या पथकाने बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी नदीपात्रात सहा ट्रॉलीमध्ये ट्रॅक्टरमध्ये वाळू भरण्याचे काम सुरू होते. कारवाई झाल्याचे लक्षात येताच चार ट्रॉली ट्रॅक्टरसह पसार झाले. दोन विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर पोलिसांच्या हाती लागले. तसेच छबू एडू कसबे (वय २७), योगेश सुखदेव साळुंके (पुरणगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ट्रॅक्टर मालक नंदूराव ठोंबरे, दत्त ठोंबरे यांच्यासह मिथुन ठोंबरे, अनिल तुवर पसार झाले.