Breaking News

'जलयुक्त'वर पाच वर्षांत दहा कोटींचा खर्च

नेवासे/प्रतिनिधी
तालुक्याच्या क्रुषिविभागाने गत दहा वर्षांच्या कार्यकाळात राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानावर अंदाजे दहा कोटींचा खर्च केला आहे. शिंगवे तुकाई, मोरगव्हाण, राजेगाव, माका, महालक्ष्मी हिवरे, पिचडगाव आदी ठिकाणी हे अभियान राबविण्यात आल्याचे या विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

या अभियानांतर्गत या गावांतील नाल्यांचे खोलीकरण, बंधारे दुरुस्ती, नाला बंडिंग आणि बांध बंदिस्ती आदी कामे करण्यात आली. असे असले तरी या तालुक्यातील अनेक गावे दुष्काळाने होरपळत असून तालुक्यातील बळीराज मोठ्या आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे. पाण्याअभावी डोळ्यासमोर उभी पिके जळून जात आहेत. बाजारात दुभत्या जनावरांना मागणी झाली असून चारा व पशखाद्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. या समस्येकडे लोकप्रतिनिधी या नात्याने आ. बाळासाहेब मुरकुटे यांचे दुर्लक्ष होत आहे.

नगदी पिकांवरच भरवसा
पाटपाण्यामुळे बागायत क्षेत्राचे वरदान लाभलेल्या या तालुक्यातल्या बळीराजाने दुष्काळावर मात करण्याची मोठी किमया केली आहे. या तालुक्यात अनेक ठिकाणी  पाॅलिहाऊस आणि शेडनेटच्या माध्यमातून फूल शेती तसेच कलर ढोबळी मिरची अशी नगदी पिके घेतली जात आहेत.

 डी. पी. डमाळे, नेवासे तालुका क्रुषि अधिकारी.