Breaking News

मनसेच्या उपशहराध्यक्षपदी सुनील धीवर

अहमदनगर/प्रतिनिधी
केडगाव येथील युवा कार्यकर्ते सुनील भिवसेन धीवर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपशहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांच्या हस्ते सुनील धीवर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी उपजिल्हाध्यक्ष मनोज राऊत, स्वप्नील सानप, अनिल धीवर, गणेश धीवर, चंदू देखाटे, रेहान शेख, दीपक राऊत, विशाल निमसे, अविनाश क्षेत्रे, सागर जरबंडी, पांडुरंग सरोदे, लक्ष्मण पाटील, कृष्णा गाडेकर, आशिष पवार, अविनाश पवार, दयाभाऊ गजबे आदी उपस्थित होते.