Breaking News

शिवसेनेच्या माध्यमातून केडगावच्या विकासाला गती : राठोड

अहमदनगर/ प्रतिनिधी
“राजकारण स्वत:साठी नव्हे तर जनतेच्या विकास व कल्याणासाठी केले जाते. केडगाव उपनगर विकासापासून वंचित होता. येथील जनतेला सुख-सुविधा निर्माण करुन देणे हे पहिल्यापासून शिवसेनेचे स्वप्न होते. केडगावच्या विकासाची स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. येथील दादागिरी संपुष्टात येऊन, शिवसेनेच्या माध्यमातून विकासाला गती मिळाली आहे’’, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी केले.
केडगावमधील एकनाथनगर परिसरात स्थानिक नगरसेवकांच्या प्रयत्नाने महापालिकेच्या माध्यमातून बंद पाईप गटार व ड्रेनेजलाईन कामाचा शुभारंभ नुकताच राठोड यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक विजय पठारे, अमोल येवले, नगरसेविका सुनीता कोतकर, शांताबाई शिंदे, प्रतिभा दारकुंडे, अलका दारकुंडे, मीना येणारे, रत्ना सरोदे, सुनीता कोहक, रेशमा पठाण, लक्ष्मी परबंडोळे, लक्ष्मण परबंडोळे, सुनील सातपुते, रमेश परतानी, बबलू शिंदे, संग्राम कोतकर, अमोल येवले, विकी भालेराव, युवराज घुले, नीलेश ढाकणे, दत्ता कोतकर, नितीन बोरकर, प्रेम कोहक, मंगेश गव्हाणे, रघुनाथ शिंदे, चांगदेव गव्हाणे, अनिल वांढेकर, सुभाष दुधाडे, विजय पोटे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राठोड पुढे म्हणाले, “नागरिकांनी आपले प्रश्‍न नि:संकोचपणे आपल्या नगरसेवकाला सांगितले पाहिजे. अर्ध्या रात्री देखील नागरिकांच्या कामासाठी मी हजर राहत असतो. केडगावची परिस्थिती बदलत असून, सर्वसामान्य जनतेचा विकास केंद्रबिंदू मानून शिवसेनेचे नगरसेवक आपले कार्य करणार आहे.’’
नगरसेवक विजय पठारे यांनी आपण निवडून आल्यानंतर पहिल्याच विकासकामाची सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या काळात नागरिकांना दिलेला शब्द पाळला असून, जनतेच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही. नागरिकांच्या विकासात्मक कार्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. नगरसेवक अमोल येवले यांनी सुरु करण्यात आलेल्या बंद पाईप गटार व ड्रेनेजलाईनच्या कामाची माहिती दिली. अनेक दिवसांपासूनचा प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे आभार मानून, प्रलंबित कामे देखील मार्गी लावण्याची आशा व्यक्त केली.