Breaking News

इंदिरा नगर भागातील मुस्लिम युवकांचा मोहनराव जगताप यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश

माजलगाव| प्रतिनिधीः-
शहरातील इंदिरा नगर भागातील मुस्लिम युवकांचा मोहनराव जगताप यांच्या उपस्थितीत पठाण सरफराज,अथर काझी, कालु भाई,माजेदभाई, छोटू भाई, असेफ भाई, अमजद पठाण यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपा नेते अच्युतराव लाटे,संतोष आबा यादव,उपनगराध्यक्ष दिपकराव मुंडे,नागरगोजे सर,बबनराव सिरसट,नगरसेवक शरद भैय्या यादव, नगरसेवक इम्रानभाई,नगरसेवक सय्यद भाई,इब्राहिम रॉकेवाले मामु,फेरोज इनामदार,प्रदीप जाधवर,कालू भाई,विनोद ढगे,हितेंद्र काळे देपगावकर,राजू सय्यद आदी उपस्थित होते. या कॉर्नर सभेत बोलताना मोहनराव जगताप म्हणाले की, मुस्लिम समाजातील युवकांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने आज पर्यंत भूलथापा दिल्या.निवडणुका आल्या की त्यांना मुस्लिम  समाज दिसतो.स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी मुस्लिम समाजाला न्याय देण्याचे काम केले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे व खासदार प्रीतमताई मुंडे सर्व समाजाला सोबत घेऊन न्याय देण्याचे काम करत असून त्यांना आपण साथ द्यावी असे आव्हान केले.तुमच्या कुठल्याही अडचणीत वेळोवेळी मी तुमच्या सोबत आहे.तुम्ही मला हाक द्या मी तुम्हाला साथ देईल असे यावेळी मोहनराव जगताप म्हणाले.यावेळी इंदिरा नगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.