Breaking News

बारामती अँग्रोच्यावतीने आपत्तीग्रस्तांना मदत

कर्जत/प्रतिनिधी
 अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यातील नुकसानग्रस्त गावातील लोकांना युवा नेते रोहित पवार यांच्या पुढाकारातून बारामती अँग्रोच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. थेरवडी, दुरगाव या गावातील अनेक कुटुंबांना धान्य, कपड्यांचे वाटप करण्यात आले.
 यावेळी बारामती अँग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकिर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड, नितीन धांडे, नानासाहेब निकत, अशोक जायभाय, पप्पु शेख, अजिनाथ जायभाय, बाळासाहेब भगत, सुभाष भगत यांच्या उपस्थितीत लोकांना ही मदत करण्यात आली.