Breaking News

जहागीरमोहा येथील त्या गुणवंत सिरसट बंधूचा सत्कार

धारूर । प्रतिनिधीः-
तालूक्यातील जहागीरमोहा येथील ऊस तोड कामगारी दोन मुलानी परीस्थीती वर मात करत एकाची वैद्यकीय शिक्षणा साठी तर एकाची अभियांञीकी शिक्षणा साठी निवड झाल्याने दोन्ही सिरसट बंधूचा सत्कार ग्रामस्थाचे वतीने करण्यात आले.
बालाघाट डोंगर रांगेतील मौजे जहागीर मोहा ता.धारुर जि.बीड येथील जि.प.प्रा.शा.जहागीर मोहा शाळेचा व माझा माजी आदर्श विद्यार्थी , ऊसतोड कामगार रंजित सिरसट यांचा मुलगा हर्षवर्धन सिरसट याची वैद्यकीय शिक्षणा   साठी प्रवेश पुर्व परीक्षेत 503 गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले असून वैद्यकीय शिक्षणा साठी निवड झाली व सदानंद रंजित सिरसट याची अभियांत्रिकी इलेक्ट्रिक  शिक्षणा साठी निवड झाल्याबद्दल जहागीर मोहा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करुन दोन्ही  भावंडासह त्यांचे वडील बौद्ध उपासक  रंजित सिरसट यांचा देखील सत्कार करुन पुढील वाटचालीस हृदयपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी पंचायत समिती धारुरचे सदस्य प्रकाशदादा कोकोटे  , ब्रम्हा सिरसट प्रा.शा.जहागीर मोहा शाळेचे माजी शिक्षक डोंगरे  , ठाणे अंमलादार कैलास कोकाटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.