Breaking News

पीएफ चोरणाऱ्या आस्थापनावर कारवाई करण्यासाठी घंटागाडी कर्मचारी आग्रही

सातपूर/प्रतिनिधी
घंटागाडी  सफाई कामगारांनाचा पी. एफ भरलाच नाही  तर काहींच्या पी.एफ मध्ये अनियमितता आहे.तर काही कर्मचाऱ्यांचे  बनावट खाते उघडत पी एफ काढून परस्पर काढला आहे अशा ,आस्थापनेवर कारवाई करावी  या   मागण्यासाठी  नाशिक महापालिका श्रमिक संघातर्फे,घंटागाडी कर्मचाच्यानी आयटीआय सातपूर ते पीएफ कार्यालय मोर्चा काढत  निवेदन  क्षेत्रिय भविष्य   निर्वाह निधी आयुक्त  अभिषेक भारद्वाज यांना
देण्यात आले.  या वेळी

विराज एंटरप्राइजेस २००९ ते २०१२ या काळात  कामगारांचे बोगस खाते  उघडत परस्पर कामगारांचे पीएफ मधील पैसे काढून  घेतले आहे.या बाबत चोकशी करत दोषींवर कारवाई करावी.तसेच समीक्षा एंटरप्राइजेस ठाणे यांनी कर्मचाऱ्यांचा   २००९ ते २०१२ या काळात पीएफ भरलाच नाही.तर जी .टी.पेस्ट कंट्रोल  सिडको,पंचवटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ मध्ये अनियमितता आहे. या बाबत ,क्षेत्रिय भविष्य   निर्वाह निधी अधिकारी भारद्वाज यांना निवेदन
देण्यात येत,चोकशी करत  दोषी असणाऱ्यावर कारवाईची मागणी  करण्यात आली. या वेळी श्रमिक संघ उपाध्यक्ष महादेव खुडे, लोटन मराठे,राजू विटकर,रफिक, सययद,कमलाकर दिवे,शिवनाथ जाधव,कैलाश मोरे,शरद अहिरे,नितीन शिराळ,राहुल अदागंळे, रवी पगारे,नंदू सकट सह शेकडो कर्मचारी उपस्थित होते.