Breaking News

वृध्देश्‍वर हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पाथर्डी/प्रतिनिधी
 श्री वृध्देश्‍वर हायस्कुल तिसगावच्या बारावी व दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. विद्यालयातील ज्ञानदा शहाजी लवांडे ही विद्यार्थींनी 95.60 टक्के गुण मिळवून तालूक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. मचे हर्षदा ही विद्यार्थींनी 95 टक्के गुण मिळवून तालूक्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तर शेख महेजबिन नसीम अहमद ही बारावी विज्ञान शाखेत तालुक्यात 88. 76 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.विद्यालयाचा एसएससी मार्च परीक्षा 2019 चा शेकडा निकाल 93.37 टक्के लागला.
  141 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, 126 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये तर 15 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये असे एकूण 282 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातील आठ विद्यार्थी नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले. तर 47 विद्यार्थी 85 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले. बारावी विज्ञान शाखेत शेख हुजेफा रियाज हा 86.15 गुणांसह द्वितीय, वांढेकर ऋतिका राजेंद्र 83.15 गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. बारावी कला शाखेत साळवे मोनिका मोहन 76 टक्के गुणांसह प्रथम, पळसकर निकिता राजेंद्र 73.53 टक्के गुणांसह द्वितीय, वाळके स्वाती भाऊसाहेब 72.76 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. बारावी किमान कौशल्य इलेक्ट्रॉनिक्स शाखेत चि.कासार मुक्तेश्‍वर उद्धव हा 73.53 टक्के गुणांसह प्रथम, लोखंडे अंजली नवनाथ 72 टक्के गुणांसह द्वितीय, भुजबळ आरती अर्जुन 69.84 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. बारावी  किमान कौशल्य ऑटोमोबाईल्स शाखेत चि.सय्यद तायर आदम हा 67.69 टक्के गुणांसह प्रथम, तेलोरे अजिंक्य संतोष 64.76 टक्के गुणांसह द्वितीय, राठोड सौरभ सुभाष 63.84 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे सभासद चंद्रकांत म्हस्के पाटील, अरविंद आठरे पाटील, डॉ.बाळकृष्ण मरकड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.