Breaking News

दक्षिण आफ्रिका-विंडीज सामना पावसामुळे रद्द

साऊदम्पटन
दक्षिण आफ्रिका आणि विंडीज यांच्यातील सामना पावसामुळे अखेर रद्द करण्यात आला. पहिल्या तीनही सामन्यात पराभव पत्कराव्या लागलेल्या दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा होता. पण पाऊस न थांबल्याने सामना रद्द करण्यात आला आणि दोनही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. आता, गुणतालिकेत विंडीज संघ पाचव्या तर दक्षिण आफ्रिका संघ नवव्या स्थानी आहे. पहिल्यावहिल्या विजयासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ सोमवारी साऊदम्पटनच्या रोज बाऊल स्टेडियमवर विंडीजविरुद्ध उतरला. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेची  खराब सुरुवात झाली. विंडीजच्या भेदक माऱयासमोर त्यांनी 7.3 षटकांत 29 धावांत 2 गडी गमावले होते. पण त्यानंतर आलेल्या पावसाने एकाही षटकाचा खेळ होऊ शकला नाही. अखेरीस, चार तासाच्या प्रतिक्षेनंतर पंचांनी सामना रद्द करत दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला.