Breaking News

हायकोर्टाच्या निकालाविरोधात मुंडे सुप्रीम कोर्टात; आज सुनावणी

नवी दिल्ली
सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. खंडपीठाच्या या निर्णयाविरोधात मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंडे यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. 

बेलखंडी येथील मठाला इनाम दिलेली सरकारी जमीन मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र साखर कारखान्यासाठी विकत घेतली. कृषी जमीनही अकृषक केली, असा ठपका मुंडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तपासी अंमलदारावरहीदेखील औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. राजाभाऊ फड यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली होती. मुंडे यांनी मात्र राजकीय कारणावरून आपल्याविरोधात आरोप करण्यात आल्याचे म्हटले होते.
मुंडे यांनी 1991 साली जगमित्र साखर कारखान्यासाठी 24 एकर जमीन खरेदी केली होती. या खरेदी व्यवहाराविरोधात बर्दापूर पोलिस ठाण्यात राजाभाऊ फड (रत्नाकर गुटे यांचे जावई) यांनी तक्रार दिली होती. ही जमीन अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील बेलखंडी देवस्थानची आहे.