Breaking News

तहानलेल्या कोल्हयाने घोटभर पाण्यासाठी विहरीत घेतली उडी

अंबाजोगाई। प्रतिनिधीः-
अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव,बर्दापूर परिसरात दुष्काळाच्या झळा अधिक तिव्र झाल्याने,पट्टीवडगाव परिसरातील पाण्याचे स्ञोत आठले असुन वन्यप्राणी राञी बे राञी, उन्हातान्हात पाण्याच्या शोधात भटकंती करीत आहे. पाण्याच्या शोधात भटकंती करुनही घोटबर पाणि मिळणे पशुपक्ष्यासह वन्य प्राण्याला मुश्कील झाले आहे.घसा कोरडा घेऊन पाण्याच्या शोधात फिरणार्‍या वन्य प्राण्यांनां आपला जिव गमवावा लागल्याचे वास्तव चित्र पाहिला मिळाले आहे.असाच प्रकार पट्टीवडगाव परिसरात घडला असुन पाण्याच्या शोधात फिरणारा पाण्याच्या शोधात भटकंती करणार्‍या वन्य प्राण्याच्या जिवावर पाणि बेतले होते. मधूकर लव्हारे यांच्या शेतातील पन्नास फुट खोल विहिरीमध्ये पाण्याने व्याकुळ झालेल्या कोल्हयाने उडी घेतली पण वरती येणे मुश्कील झाले. पाण्याच्या शोधात विहरीत कोल्हा पडल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने याची खबर वन विभागाच्या कर्मचार्‍या देण्यात आली. कर्मचारी व ग्रामस्थ विहरीत पडलेला कोल्हा जीवंत काढण्यात यश आले असुन थोडीसी जखम झाल्या मुळे पोत्यात घालून पशुवैद्यकीय दवाखाण्यात घेऊन जात असतानां कोल्हयाने धूम ठोकूण पळ काढला.कोल्ह्याचे प्राण वाचवण्यासाठी मधुकर लव्हारे, विष्णु मुसळे,राजाभाऊ कांबळे, वनविभागाचे ए एन तोंडे,जी एस दहिफळे,अड केशव लव्हारे नितीन शिंदे आदिसह ग्रामस्थानीं परिश्रम घेतले.