Breaking News

पॅराग्वेला नमवत ब्राझीलची उपांत्य फेरीत धडक

 नवी दिल्ली
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत आज (शनिवार) झालेल्या पॅराग्वे व ब्राझीलच्या लढतीत ब्राझीलने बाजी मारली. ब्राझीलने पेनल्टी-शूटआऊटमध्ये पॅराग्वेचा ४-३ असा पराभव करत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली. अतिशय चुरशीच्या झालेल्या पेनल्टी-शूटआऊटमध्ये अखेरच्या क्षमी गॅब्रियल जिजसने गोल करत ब्राझीलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

   २०११ आणि २०१५ मध्ये ब्राझीलला पॅराग्वेकडूनच उपांत्यपूर्व फेरीत पराभूत व्हावे लागले होते