Breaking News

जेऊर हैबती येथे एकास तलवारीने मारहाण

 अहमदनगर /प्रतिनिधी 
तालुक्यातील जेऊर हैबती येथील अंबादास कारभारी गायकवाड (वय-३३) या इसमाला चार जणांनी तलवारीने मारहाण करण्याची घटना घडली. यात गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  अंबादास कारभारी गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी ९ जून रोजी सकाळी १०:४५ वाजता जेऊर हैबती(ता.नेवासे) येथील ओमसाई मोबाईल शाँपी येथे बसलेलो असताना तेव्हा काही कारण नसताना अक्षय दिलीप उगले, शाहुराव भाऊराव उगले, दिलीप भाऊराव उगले, सुनील भाऊराव उगले हे चौघे तेथे आले व मला शिवीगाळ केली. यातील अक्षय उगले याने मला तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केले व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यातील बाकी तीन लोकांनी मला जीवंत सोडू नका' ठार मारून टाका असे म्हटले. या संदर्भात भा.द.वि.क ३०७,३२३,५०४,५०६, आर्म अँक्ट