Breaking News

नीरव मोदींचा जामीनअर्ज पुन्हा फेटाळला, गजाआड

लंडन
पंजाब नॅशनल बँकेला ठकवणारा हिरे व्यापारी नीरव मोदीला सलग चौथ्यांदा लंडनमधील न्यायालयाने दणका दिला. लंडनमधील उच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा एकदा मोदीचा जामीनअर्ज फेटाळून लावला असून त्याला आता आणखी काही काळ तुरुंगात रहावे लागणार आहे. पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून नीरव मोदी लंडनमध्ये पळाला होता. मार्च महिन्यात नीरव मोदीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तुरुंगातून सुटका व्हावी, यासाठी नीरव मोदीच्या वतीने तीन वेळा जामीनअर्ज करण्यात आला; मात्र लंडनमधील न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. अखेर त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. जामिनासाठी नीरव मोदीच्या वतीने प्रकृतीचे कारण देण्यात आले होते.