Breaking News

दुभत्या जनांवरांची भुक तुराट्या व झाड पाल्यावर

पाऊस लांबनीवर शेतकर्‍याच्या चिंतेत वाढ

अंबाजोगाई। प्रतिनिधीः-
अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव परिसरात भयान दुष्काळी परिस्थिती दिवसांन दिवस वाढत असून पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकरी चिंतातूर झाल्याचे पाहिला मिळत आहेत.ङ्गदुष्काळा परिस्थितीमुळे बर्दापूर परिसरात छावणीला नां दावणीला चारा नं मिळाल्यामुळे शेतकर्‍यानां अव्वाच्या सव्वा भावाने कडबा विकत घेऊन जनांवरांची भुक भागवावी लागली आहे. चारा पाण्याअभावी अनेकांनी दुभती जनांवर विक्री केली आहे. शेतकर्‍यानां अशा होती वेळेवर पाऊस पडेल व चारा पाण्याची समस्या मिठेल.अभाळ आले अण गेले त्या मुळे शेतकरी हवलदिवल झाले आहेत. शेतकर्‍यानी विकत घेतलेला चारा संपला असुन सध्याच्या परिस्थितीत विकतही चारा मिळणे मुश्कील झाले आहे. चारा विकत मिळाली तरी चारा घ्यावा की पेरणीची तयारी करावी असा प्रश्‍न शेतकर्‍यानां पडला असुन पशुधन कसे सांभाळावे याची चिंता शेतकर्‍यानां आता पाऊस लांबणीवर गेल्याने पडली आहे.सुगाव येथील शेतकरी कुलदिप व्यंकट आरसुळ याही शेतकर्‍याने चारा विकत घेऊन दुभत्या म्हशी दुष्काळी परिस्थितीत सांभाळल्या. पाऊस वेळेवर पडला तर बांध हिरवीगार होऊन चार्‍याचा प्रश्‍न मिटेल अशी आशा होती. चारा संपला पाऊस लांबणीवर गेला मग दुभती जनांवरे कशी जगवावी याच चिंतेत होती. दुभती जनांवरे विकताही आत्ता  विकताही येत नाहीत आण उपाशी पोटीही ठेवता येत नाही मग दुभती जनावरे कशी  सांभाळायची असा प्रश्‍न पडला. कुलदिप आरसुळ यांनी तुरीच्या तुराट्या,लिंब,सुबाभळ व चिंचेंच्या पाल्यावर दुभत्या जनावरांची भुक भागवत असून वेळेवर पाऊस नं झाल्यास जनांवरी कशी पोसावी हाच प्रश्‍न शेतकर्‍यानां पडला असुन पोटाला पोटभर चारा मिळत नसल्यामुळे दुभती जनावरी आटली असुन तर कांहि गायी, म्हशीच्या दुधातही मोठया प्रमाणात घट झाल्याचे शेतकरी सांगत असुन त्यामुळे  शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात अर्थीक नुकसान ही झाले आहे.
शासनांने शेतकर्‍याला चारा उपलब्ध नं केल्यामुळे जनांवरांचे खुप हाल झाले आनं होत आहेत.विकत घेतलेला चारा आत्ता संपला असुन उपाशी पोटी दुभती जनांवरी कशी ठेवावी म्हणून कधी तुराट्या व अदलून बदलून झाडपाला टाकत असुन कडबा व ईतर चारा होता तो पर्यंत डेअरीला 10 लिटर दुधा जात होते. झाडापाला सुरु केल्यापासुन दुधात घट झाली असून तिन ते चार लिटर दुध आजच्या परिस्थितीत निघत आसल्याने अर्थीक नुकसान ही होत आहे.
कुलदिप आरसुळ शेतकरी सुगाव