Breaking News

काबूलमधील स्फोटात 34 ठार

काबूल
अफगाणिस्तानच्या राजधानीमध्ये आज सकाळी एक शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात जवळपास 34 लोकांचा मृत्यू झाला असून 68 जण जखमी झाले आहेत. वृत्त संस्था सिन्हुआनुसार दहशतवादी पुल-ए-महमूद खानमध्ये एका निर्माणाधीन इमारतीमध्ये घुसले होते. या ठिकाणी सुरक्षादलाशी त्यांची चकमकही झाली.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की दहशतवाद्याने पहिल्यांदा त्यांच्या बॉम्बनी भरलेल्या कारचा स्फोट घडविला आणि पुन्हा गोळीबार सुरू केला. या भागात संरक्षण मंत्रालयाची इमारत, खेळाचे मैदान, सूचना आणि संस्कृती मंत्रालयाची एक शाखा आणि घरे आहेत. स्फोटानंतर बर्‍याच अंतरावर आवाज ऐकायला गेला होता. त्यानंतर उडालेला धूरही लांबून दिसत आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने जबाबदारी स्वीकारलेली नाही. तालिबानी आणि अमेरिकेच्या प्रतिनिधीमंडळांमध्ये सातव्या टप्प्यातील चर्चा सुरू झाली आहे, त्या वेळी नेमका हा स्फोट झाला. अफगाणिस्तानमध्ये शांतता चर्चेसाठी कतारमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही बाजूंकडून जवळपास दोन दशकांपासून सुरू असलेला संघर्ष संपविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; मात्र तालिबानने अफगाणिस्तान सरकारसोबत चर्चेला नकार दिला आहे.
आज झालेल्या बॉम्बहल्ल्यामुळे जवळपास दीड किलोमीटरपर्यंत हादरे जाणवले.  रविवारी झालेल्या हल्ल्यात 26 जवान ठार झाले होते. शिवाय 8 जवान जखमी झाले होते.