Breaking News

भारताच्या पराभवामुळे स्टार स्पोर्टसला 3 अब्जचा फटका

नवी दिल्ली
विश्‍वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताच्या प्रभावामुळे स्टार स्पोर्टसच्या क्रिकेटदर्शकांची संख्या खूप कमी झाली आहे. त्यामुळे जाहिरातीचे दर कमी झाले असून चॅनेलला सुमारे 3 अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. विश्‍व कपच्या प्रसारणाचे अधिकार स्टार टीव्ही आणि त्यांच्या डिजिटल मीडिया नेटवर्क हॉटस्टार यांच्याकडे आहेत.
यावेळी भारत अंतिम फेरीत जाईल अशी सर्वांना आशा होती. दर्शकांची संख्या चांगली वाढली होती. अंतिम सामन्यासाठी जाहिरातींचे दर चार - पाच पट वाढवले होते. पण, उपांत्य सामन्यात भारत हारला आणि दर्शकांची संख्या कमी झाली. जाहिरातींच्या कमाईचे सारे आराखडे कोसळले. आता जाहिरातीचे दर 50 टक्क्यांपेक्षाही जास्त कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात जाहिरातींसाठी 30 ते 35 लाख रुपये प्रति सेकंदसाठी मागण्यात येत होते. कारण तेंव्हा भारत अंतिम फेरीत जाईल अशी आशा होती. आता जाहिरातींचा दर 10 - 15 लाख प्रति सेकंदपेक्षाही कमी आहे. भारत - न्यूजीलैंडयांच्यात झालेल्या सामन्यालाही दर्शकांची संख्या खूप जास्त - 1. 9 कोटी होती. ही संख्या या वर्षीच्या मुंबई इंडियंस आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातील आयपीएल अंतिम सामन्याच्या 1. 86 कोटी दर्शकांपेक्षा जास्त होती. विश्‍वकपच्या 27 वर्षांच्या इतिहासात इंग्लंड पहिल्यांदा अंतिम फेरीत पोहचला आहे. या सामन्याचे इंग्लंडमध्ये निःशुल्क प्रसारण करण्यात येणार आहे.