Breaking News

जलालपूरला कृषी दिंडी

कर्जत/प्रतिनिधी
सद्गुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव व जलालपूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जलालपूर येथे कृषीदिन समारोपानिमित्त कृषी दिंडी, व्याख्यानमाला व वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला. उपसरपंच जयश्री कासार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जलालपूर यांच्यावतीने गावामध्ये वृक्ष दिंडी काढण्यात आली. झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा अशा घोषणा देत जनजागृती केली. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावात वृक्ष संवर्धनाविषयी जनजागृती करून, उसावरील हुमणी आळी आणि कापसावरील बोंडआळी या विषयावर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.संदीप बोराटे, ग्रामपंचायत सदस्य रोहिदास गावडे, दिपाली काळे, कृषी सहायक पाबळे, धनंजय काळे, सद्गुरू कृषी महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.ए.एम.गोरे, प्रा.पी. एस.इनामके, प्रा.टी.डी. म्हस्के, केंद्रप्रमुख येवले उपस्थित होते. कृषीकन्या  नुतन येडे, वृषाली खेतमाळस, प्रतिक्षा रेपाळे, पुजा धोंगडे, वर्षा पवार, अमृता खेतमाळस, नम्रता वैराळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. त्याचा मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी लाभ घेतला.