Breaking News

देशद्रोहाच्या खटल्यात वायको दोषी, एक वर्षाची शिक्षा

चेन्नई
देशविरोधी भाषण केल्याच्या आरोपात दाखल झालेल्या देशद्रोहाच्या खटल्यात एमडीएमकेचे नेते वायको दोषी ठरले आहेत. चेन्नईच्या एका न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. वायको यांनी कोर्टाकडे शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती केली. कोर्टाने त्यांची विनंती मान्य करून शिक्षेला स्थगिती दिली. यामुळे वायको यांचा राज्यसभेची निवडणूक लढू शकतील. चेन्नईत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात 2009मध्ये देशाविरोधी भाषण केल्याचा वायकोंवर आरोप आहे. श्रीलंकेतील अंतर्गत युद्धावर भाषण देताना वायको यांनी दहशतवादी संघटना एलटीटीईचं समर्थन केलं होतं. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्याचा निकाल लागला.