Breaking News

हिंगणी बंधारा कृती समितीकडून जल पूजन

कोपरगाव / ता.प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्याने या वर्षी तीव्र दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर काल प्रथमच गोदावरी नदीला  पाणी आले. या पहिल्या पाण्याचे हिंगणी बंधारा कृती समितीच्या वतीने हिंगणी बंधाऱ्याजवळ विधिवत पूजन करण्यात आले. खणानारळाने ओटी भरली. यावेळी संदीप गुरुळे दिनेश साळुंके, सुभाष थोरात, दत्तू पवार, प्रकाश सोनवणे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

    पाऊस कितीही झाला तरी गोदावरी नदीला पाणी आल्याशिवाय लाभ क्षेत्रातील शेतकरी व नागरिकांना समाधान लाभत नाही. पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटून गेला तरी धरण क्षेत्रात चांगला पाऊस नव्हता. यावर्षी लाभक्षेत्रात पाऊस थोडा उशिरा सुरू होऊन शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या तरी गोदावरी नदी कोरडीच होती. तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला.शनिवारी व रविवारी नाशिक  त्रंबकेश्वर इगतपुरी परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीला यंदा प्रथमच पाणी आले.