Breaking News

वर्धापनदिनानिमित्त महापालिकेत रक्तदान

अहमदनगर/प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात मनपा रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये ‘आम्ही पालिकेचे भक्त... देतो एक पिशवी रक्त!’ हे बी्रदवाक्य घेऊन कर्मचारी व अधिकार्‍यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी उपायुक्त प्रदीप पठारे, उपमहापौर मालन ढोणे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती लता शेळके, उपायुक्त सुनील पवार, वृक्ष अधिकारी उद्धव म्हसे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, कुमार सारसर, रवी वखारे, राजू लयचेट्टी, किशोर कानडे, बंडू युवळे, अन्वर शेख, प्रसिद्धी अधिकारी मिलिंद वैद्य, नंदा भिंगारदिवे, डॉ. शेडाळे आदी उपस्थित होते.