Breaking News

सोयाबीनच्या विम्याचे पैसे एक महिन्यात मिळणार

बीड | प्रतिनिधीः-
गेल्या काही दिवसापूर्वी विमा कंपनीने कापूससही इतर पिकाचा विमा जाहीर केला. मात्र सोयाबीनला विमा देण्यात आलेला नव्हता. या प्रकरणी गंगाभीषण थावरे यांनी पुण्याच्या इन्शुरन्स कार्यालयासमोर आंदोलन केले होते. यावेळी त्यांना कंपनीच्या अधिकार्यांनी आश्‍वासन दिले होते. त्यानुसार एक महिन्यामध्ये सोयाबीन धारकांना विम्याची रक्कम मिळणार असल्याचे गंगाभीषण थावरे यांनी सांगितले असून याप्रकरणी कोणीही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांनी खरीप हंगामात विविध पिकाचा विमा भरला होता. या विम्याची रक्कम काही दिवसापूर्वी इन्शुरन्स कंपनीने घोषीत केली. सर्व पिकांचा विमा जाहीर केला मात्र सोयाबीनला विमा दिलेला नव्हता. कापसानंतर जिल्ह्यात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे.