Breaking News

के.एस.पी. विद्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

बीड | प्रतिनिधीः-
रोजी शहरातील कालिका नगर भागातील के.एस.पी.(कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले) विद्यालयात वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषिदिन उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जेष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी ऋषीकेशजी शेळके साहेब,प्रमुख पाहुणे म्हणून संस्था अध्यक्षा सौ.अंजलीताई शेळके मॅडम, शाळेचे प्र.मुख्याध्यापक जे.बी. शिंदे सर यावेळी प्रमुख उपस्थित होते.  
यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शेळके साहेब म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व एक कृषितज्ञ. नाईकांचे मूळ आडनाव राठोड; पण गहुली हे खेडे चतुरसिंग राठोड याने वसविले. त्याने जमीनजुमला जमा करून आपल्या समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. साहजिकच तो बंजारा समाजाचा नाईक म्हणजे पुढारी झाला. त्यावरून पुढे नाईक हे आडनाव रूढ झाले. विद्यार्थिदशेत त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले व डेल कार्नेगी या दोहोंच्या विचारांची छाप पडली. ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.  त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या. प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी  सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन व्यावहारिक असे. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्याकडे जाते. या कार्यक्रमाला विद्यालयाचे श्री.गडकर सर,श्री.सुपेकर सर, राठोड सर, श्री.ढवळे सर, श्री शिंदे, सौ.शिनगारे मॅडम, सौ.कापरे मॅडम, सौ.मातकर मॅडम, वाघमारे सर,दाबेकर सर,खिंडीवले मॅडम, सौ.ठोकरे मॅडम,आदींची उपस्थिती होती.