Breaking News

आंतरजातीय विवाह केलेल्या दलित तरुणाची पोलिसांसमोर हत्या

अहमदाबाद
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात ’ऑनर किलिंग’चा प्रकार उघडकीस आला आहे. हरेश सोळंकी असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. हरेशने उच्चवर्णीय मुलीशी विवाह केला होता. या मुलीच्याच कुटुंबीयांनी पोलिसांदेखत हरेशची हत्या केली. कुटुंबीयांनी केलेल्या हल्ल्यात पोलिस अधिकारीही जखमी झाले आहेत.
हरेशचा उर्मिला या मुलीशी विवाह झाला होता. 181-अभयम या महिला हेल्पलाईनची मदत घेऊन आपल्या गर्भवती पत्नीला परत आणण्यासाठी हरेश उर्मिलाच्या माहेरी गेले होतेा. या वेळी हरेशबरोबर पोलिसही होते. उर्मिलाच्या कुटुंबियांपैकी आठ जणांनी हरेशवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यामध्ये हरेशचा मृत्यू झाला तर महिला कॉन्स्टेबल जखमी झाल्या आहेत. उर्मिलाच्या घरी गेलेले अभयम हेल्पलाईनचे अधिकारीच या प्रकरणात तक्रारदार झाले आहेत. हरेश त्याच्या कुटुंबातला एकमेव कमावता होता आणि त्याच्या हत्येमुळे आता विखुरलेल्या या कुटुंबावर आर्थिक संकटही ओढवले आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत.