Breaking News

सुषमा स्वराज, जेटली यांनी केली निवासस्थाने खाली

नवीदिल्ली
प्रकृती अस्वस्थतेचे कारण देऊन मोदी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेणार्‍या भाजपच्या जेष्ठ नेत्या सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी तातडीने आपली शासकीय निवासस्थाने सोडली आहेत. आपल्या पदावरून दूर झाले, तरी पुष्कळदा नेते शासकीय निवासस्थान सोडत नाही; मात्र स्वराज यांनी तसे न करता आपले निवासस्थान लगोलग सोडले आहे. स्वराज यांच्याशिवाय माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही आपला सरकारी बंगला सोडल्याची माहिती आहे.
ट्विटरद्वारे स्वराज यांनी सरकारी बंगला सोडल्यानंतर याबाबत माहिती दिली आहे. सुषमा स्वराज यांनी घेतलेला हा निर्णय नेटकर्‍यांच्या चांगलाच पसंतीस पडला असून त्यांच्या या निर्णयाचे नेटकर्‍यांनी स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, लोकसभेचा कार्यकाल संपल्यानंतर संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या नेत्याला एका महिन्याच्या आतमध्ये सरकारी बंगला सोडणे बंधनकारक असते. त्यानुसार स्वराज आणि जेटली यांनी बंगले सोडले आहेत.