Breaking News

पडत्या काळातील मदतीची कृतज्ञता म्हणून धोनी बदलतो बॅट!

मुंबई
महेंद्र सिंग धोनी सामन्यादम्यान अनेक वेळा बॅट बदलत असतो. त्याची ही कृती अनेकांना पचणारी नाही. तो जाहिरातीसाठी असे करतो असा काहींचा समाज आहे. मात्र हा समज सपशेल खोटा आहे. धोनीने अशाप्रकारे अचानक बॅट बदलण्यामागे एक खास कारण आहे. ते कारण म्हणजे कठीण काळामध्ये धोनीच्या पाठीशी उभे राहिलेल्या बॅट कंपन्यांना धोनीने दिलेली ही भेट आहे किंवा धोनीने त्यांच्या विषयी व्यक्त केलेली कृतज्ञता असेही म्हणावे लागेल.
महेंद्र सिंग धोनी मागील काही माहिन्यांपासून तीन वेगवेगळ्या बॅटने खेळताना दिसत आहे. त्यातही विश्‍वचषकातील अनेक सामन्यांमध्ये धोनी अचानक बॅट बदलून खेळतानाचा प्रकार अनेकदा पहायला मिळाला आहे. मात्र धोनीने अशाप्रकारे अचानक बॅट बदलण्यामागे एक खास कारण आहे. ते कारण म्हणजे कठीण काळामध्ये धोनीच्या पाठीशी उभे राहिलेल्या बॅट कंपन्यांना धोनीने दिलेली ही भेट आहे. मागील काही महिन्यापासून धोनी एसएस, एसजी आणि बीएएस या बॅट्सने खेळताना दिसतोय. जेव्हा तो फलंदाजीला येतो तेव्हा त्याच्याकडे वेगळ्या ब्रॅण्डची बॅट असते आणि शेवटच्या षटकांमध्ये तो वेगळ्या बॅटने फलंदाजी करताना दिसतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने अगदी शेवटच्या चेंडूआधी बॅट बदलली आणि शेवटच्या चेंडूवर त्याने थेट षटकार लगावल्याचे पहायला मिळाले. धोनी सतत बॅट का बदलतो याबद्दलचा खुलासा त्याच्या व्यस्थापकाने केला आहे. धोनी आपल्या कृतीमधून त्याच्या प्रायोजकांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने धन्यवाद म्हणत आहे. या प्रायोजकांनी सुरुवातीच्या कठीण काळात धोनीवर विश्‍वास दाखवला त्यामुळेच धोनी एक यशस्वी क्रिकेटपटू होऊ शकला. असे मत धोनीच्या व्यवस्थापकांनी व्यक्त केले आहे. धोनीचे व्यवस्थापक अरूण पांडे यांनी एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत यासंदर्भात चर्चा केली. ‘धोनी मोठ्या मनाचा माणूस आहे. तो मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या बॅट वापरत आहे. मात्र त्यासाठी तो कोणत्याही प्रकारचे शुल्क या कंपन्यांकडून घेत नाही. आपल्या करियरमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याला साथ देणार्‍या या बॅट कंपन्यांच्या ब्रॅण्ड्सचे तो त्याच्या पद्धतीने आभार मानत आहे,’ असे पांडे म्हणाले. धोनीला आता पैश्यांची गरज नाही. पैसा त्याच्याकडे भरपूर आहे, असे पांडे यांनी सांगितले. ‘कठीण काळात मदत करणार्‍या कंपन्यांबद्दल धोनीला वाटणारा आदार तो आपल्या कृतीतून व्यक्त करत आहे. धोनी सुरुवातीपासूनच बीएएसच्या बॅट वापरायचा. तर एसजी कंपनीनेही धोनीची अनेकदा मदत केली आहे.’ धोनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठा खेळाडू होण्याआधीच बीएस धोनीसोबत आहे. या कंपनीचा संदर्भ धोनीवर आधारित सिनेमामध्येही पहायला मिळतो. धोनीबरोबच्या नात्याबद्दल बोलताना ‘बीएएस’ चे पुष्प कोहली यांनी धोनीच्या या कृतीतून त्याच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.