Breaking News

गुंठेवारी खरेदी होणार कायदेशीर : मंत्रिमंडळात निर्णय

अहमदनगर/प्रतिनिधी
राज्यातील शहरी भागातील जमीन गुंठेवारीच्या आकारात खरेदी करताना सक्षम प्राधिकार्‍यांंची परवानगी घेतली नाही, अशा जमिनींची प्रकरणे जमीन महसूल कायद्यात सुधारणा करून नियमित केली जाणार आहेत. याबाबत मंत्रिमंडळात निर्णय झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे छोट्या खरेदीदारांना फायदा होणार आहे. एक-दोन गुंठे इतकी जमीन खरेदी करण्यासाठी विभागीय आयुक्त अथवा जिल्हाधिकार्‍यांची परवानगी लागते, मात्र अनेक प्रकरणात परवानगी घेतलेली नाही, ही बाब समोर निर्णय झाला. पूर्व परवानगीशिवाय झालेली जमिनीचे हस्तांतरण नियमित करण्यासाठी इनाम किंवा वतन विषयक प्रमुख कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इनाम वतन जमिनीच्या प्रचलित बाजारमूल्याच्या 25% रक्कम आकारून तसेच नियमित प्रशमन शुल्क व विकास आकार वसूल करून अशा जमिनीवरील गुंठेवारी विकास नियमित करण्यात येणार आहेत. राज्यात गुंठेवारी पद्धतीने विक्री केल्या गेलेल्या जमिनीवरील बांधकामावर प्रशमन शुल्क आणि विकास आकार देऊन नियमित करण्यास संबंधित निर्णय घेतला जातो. मात्र गुंठेवारी पद्धतीने विकल्या गेलेल्या वतन किंवा इनाम जमिनीच्या पोटी सरकारला नजराणा मिळणे आवश्यक असतो.