Breaking News

एसटीच्या स्मार्ट कार्ड साठी वृद्धांची पायपीट

मुंबई
ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसेस मध्ये मिळत असलेल्या भाडे सवलती साठी नेहमीचे वयाचे दाखले द्यावे लागत होते परंतु यानंतर हद्दपार होणार असून त्या साठी शासनाने आता ऑनलाइन स्मार्ट कार्ड वाटप सुरू केली आहे या स्मार्ट कार्ड साठी मात्र वृद्ध व जेष्ठ नागरिकांना प्रचंड पायपीट होत असून मोबाईल नसल्यामुळे स्मार्ट कार्ड काढतांना त्यांना मानसिक त्रास होत आहे, तर दुसरी कडे खाजगी सेन्टर या वृद्धांची आर्थिक लुबाडणूक होत असल्याचे दिसून येत आहे,
ज्येष्ठ नागरिकांना बस भाड्यात शासनाकडून पन्नास टक्के सवलत मिळते त्यासाठी त्यांना वयाच्या दाखल्याचे कार्ड दाखवावे लागत होते, अनेक लोक खोटे दाखल्यांच्या आधारावर शासनाची लुबाडणूक ही करत होते त्याला आळा बसावा म्हणून शासनाने या प्रवाशांना स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी एसटी डेपो मध्ये तशी व्यवस्था केली आहे परंतु ही व्यवस्था अत्यंत तोकडी असून वृद्धांना स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी अनेक अडचणी येत आहे विशेष म्हणजे या स्मार्ट कार्ड साठी स्वतःचा मोबाईल असणे आवश्यक आहे. मशीनवर फिंगरप्रिंट दिल्यानंतर त्यांचे ऑनलाईन नोंदणी होते त्यानंतर दहा दिवसात हे स्मार्ट कार्ड उपलब्ध होते परंतु अनेक वृद्धांजवळ स्वतःचा मोबाईल नंबर व मोबाईल नाही त्यामुळे त्यांना यामध्ये अडचण जात आहे त्यावर पर्याय म्हणून कुटुंबातील कोणाही व्यक्तीचा मोबाईल नंबर वृद्ध वापरत आहे परंतु ओटीपी साठी पुन्हा त्रास सहन करावा लागत आहे. या स्मार्टकार्डसाठी शासनाकडून 55 रुपये शुल्क आकारले जात आहे. शासनाकडून एकच युनिट या स्मारकासाठी पुरवले गेले व त्यावरच विद्यार्थ्यांचेही कार्ड चा बोजा पडत असल्यामुळे एकच गर्दी याच ठिकाणी होत आहे याला उपाय म्हणून डेपो तर्फे खाजगी सेंटर या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे परंतु या सेंटरवर ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अतिरिक्त शुल्क या ज्येष्ठ नागरिकांकडून वसून येत असल्यामुळे वृद्धांमध्ये संभ्रम निर्माण होत प्रचंड मानसिक त्रास होत आहे याविषयी डेपो मॅनेजर उमेश इंगळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी लगेच खाजगी सेंटरच्या संचालकाला तशा सूचना देऊन ठरवलेले शुल्क घेणे बाबत सूचना देणार असल्याचे सांगितले याविषयी वाटपासाठी रांगेत उभ्या असलेल्या वृद्धांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता त्यांनी त्यांच्या अनेक अडचणी सांगितल्या तसेच जुनीच कार्ड सुरू ठेवावे अशी मागणी शासनाकडे केली. आमच्याजवळ मोबाईल नाही त्यामुळे दोन-तीन दिवसापासून आम्ही या ठिकाणी चकरा मारत आहे आज मुलाचा मोबाईल नंबर आणला परंतु याठिकाणी प्रत्यक्षात मोबाईल पाहिजे असल्याचे समजले त्यामुळे पुन्हा परत जाऊन मोबाईल घेऊन यावे लागणार आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक देतांना दिसून येत आहे.