Breaking News

एचटीबीटी प्रकरणात शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घ्या

कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे आदेश

नागपूर
बंदी असलेल्या एचटीबीटी बियाणांच्या लागवड प्रकरणात विदर्भात शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे मागे घ्या, तसेच भविष्यात एचटीबीटी बियाणे लागवड प्रकरणात शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करू नका, असे आदेश कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले आहेत. या बियाणांबाबात राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कुलगुरुंना अहवाल मागितला असून त्यावर सरकार निर्णय घेणार आहे, असेही ते म्हणाले. कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे नागपूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, महिनाभरात कृषी सहाय्यकांची पदे भरणार असून, आता कृषी सहाय्यकांना गावात जाणे बंधणकारक आहे. तसेच खतांचा काळाबाजार किंवा बोगस बियाणे विकणार्‍यांवर कठोर कारवाई होणार, असल्याचेही बोंडे यांनी सांगितले. तर नागपूर विभागात यंदा सरासरीच्या 73 टक्केच पाऊस पडल्याने आतापर्यंत 35 टक्केच पेरण्या झाल्याची माहिती त्यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत दिली.