Breaking News

शिंदे येथे कृषी दिनानिमित्त वृक्षदिंडी

कर्जत/प्रतिनिधी
 कर्जत तालुक्यातील शिंदे येथे सद्गुरू कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस ‘कृषीदिन’ म्हणून विविध उपक्रमांनी साजरा केला. गावामध्ये वृक्षदिंडी काढून कृषीकन्यांनी वृक्षारोपण व त्यांच्या संवर्धनाविषयी जनजागृती केली.
 न्यु इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात कृषीक्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव करून कृषीकन्यांनी ग्रामस्थांना सविस्तर माहिती दिली. यावेळी कृषी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका गायकवाड, व साळुंके तसेच सरपंच वंदना घालमे, न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य गोसावी, स्कुल कमिटीचे अध्यक्ष रुपचंद घालमे, ग्रामस्थ राम हवालदार, गौतम घालमे, कुशाबा घालमे व संदिप घालमे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कृषीदिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना कृषी कन्यांच्या वतीने बक्षिस वितरण करण्यात आले.
फोटो-
   कर्जत येथे सद्गुरू कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी कृषी वृक्षदिंडी काढली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.