Breaking News

माजी सैनिकांची पोलीस कर्मचार्‍याना मारहाण;


माजी सैनिकांसह पंचवीस जणा विरोधात गुन्हा दाखल

गजानन महाराजाच्या पालखीचे दर्शन रांगेत न घेण्यावरुन झाला वाद

केज| प्रतिनिधीः-
गजानन महाराजाच्या पालखीचे दर्शन रांगेत घ्या म्हणून सांगणार्या तिन पोलीस कर्मचार्याना माजी सैनिकांने व त्यांच्या नातेवाईकाने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता बोरीसावरगाव येथे घडली या प्रकरणी माजी सैनिकांसह पंचवीस जणा विरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी युसुफवडगाव पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. संत श्री गजानन महाराज यांची शेगाव येथुन निघालेली पालखी तालुक्यातील बोरीसावरगाव येथे मुक्कामी थांबत असल्याने गजानन महाराज यांच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. शुक्रवारी संध्याकाळी संत श्री गजानन महाराज यांची पालखी बोरीसावरगाव येथे मुक्कामी असल्याने युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी भागवत कांदे , एस एम खनपटे व बालाजी घोरपडे यांची पालखीच्या बंदोबस्तासाठी नेमनुक करण्यात आली होती. बोरीसावरगाव येथे शुक्रवारी रात्री पालखी मुक्कामी थांबल्यावर पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याने भाविक रांगेने पालखीचे दर्शन घेत असताना या वेळी बोरीसावरगाव येथील माजी सैनिक अरूण उर्फ किरण अशोक पौळ हे दारुच्या नशेत तेथे येवुन दर्शन रांग मोडून पुढे जात असताना त्यांना बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी कांदे यांनी रांगेत पालखीचे दर्शन घ्या असे सांगितल्याने याचा राग आल्याने माजी सैनिक पौळ याने फौजी लोकांना कुठे रांग असते का असे म्हणत पोलीसांशी वाद घालण्यास सुरुवात केली या वेळी पोलीस कर्मचार्या मध्ये व माजी सैनिक पौळ यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांने गावात जाऊन आपल्या नातेसंबंधातिल वीस ते पंचवीस लोकांना पालखीच्या ठिकाणी आणुन बंदोबस्त करत असलेल्या पोलीस कर्मचारी एस एम खनपटे , बालाजी घोरपडे व भागवत कांदे यांना लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली हा प्रकार शुक्रवार दिनांक २८ जुन रोजी रात्री साडे आठ वाजता घडला या मारहाणीत पालखीच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले तिघे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हा वाद पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मध्यस्थी करून सोडविला. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भागवत व्यंकट कांदे बक्कल नंबर ४१२ यांच्या फिर्यादी वरुन माजी सैनिक अरुण उर्फ किरण अशोक घोरपडे रा बोरीसावरगाव याच्यासह पंचवीस जणा विरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी व्ही गोडसे करत आहेत. या प्रकरणी शनिवारी रात्री पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.