Breaking News

आषाढी एकादशीच्या निमित्ताने अभिषेक संपन्न

लासलगाव/प्रतिनिधी
येथील सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे केंद्र असलेले पुरातन श्रीराम मंदिर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्तींचा पहाटे चार वाजता महाअभिषेक करण्यात आला. सौ. रत्नमाला पाटील व श्री प्रभाकर पाटील यांच्या हस्ते हा अभिषेक संपन्न झाला. सकाळी सहा ते सात वाजे पर्यंत काकड आरती करण्यात आली.
श्रीराम मंदिर ट्रस्ट च्या वतीने सकाळी आठ वाजता महापुजा झाली. जि. प.सदस्य डि.के  जगताप, शुभम दायमा, योगेश पवार, सचिन डुंबरे, नंदकिशोर डुंबरे, बाबजी पाटील हे या महापूजेसाठी सपत्निक उपस्थित होते.
या प्रसंगी श्रीराम मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष बबनराव पाटील, डॉ. कैलास पाटील, सुरेश वडनेरे, डॉ. युवराज पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पौरोहित्य नंदकिशोर भंडारी, विजय जोशी, अशोकराव अग्निहोत्री, भास्कर जोशी, निलेश अग्निहोत्री, ऋषीकेश जोशी, जितेंद्र गुरव यांनी केले. मंदिरातील सर्व देवता मुर्तींना रजत अलंकाराने आणि वेगवेगळ्या फुलांनी सुशोभित करण्यात करण्यात आले होते. दिवसभर श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी रीघ लावली होती.