Breaking News

पंतप्रधान मोदी घेणार संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेत भाग

नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार आहेत. या दरम्यान संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेत भाग घेणार आहेत. पंतप्रधान पदाची सूत्रे दुसर्‍यांदा हाती घेतल्या नंतर मोदी पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेत सहभागी होणार आहे. 23 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विषयावर होणार्‍या विशेष सभेला पंतप्रधान मोदी संबोधीत करणार आहेत. आपल्या अमेरिका दौर्‍यात मोदी हॉस्टन येथे भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात भाग घेणार असून सभेस संबोधित करणार आहेत. 2014 साली पहिल्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाल्या नंतर नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेस संबोधित केले होते तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनाबाबत प्रस्ताव ठेवला होता.