Breaking News

नांदुर घाट मध्ये पोलीस चौकीपासून चोरांचा हैदोस

सुभाष झाडबुके यांना जबर मारहाण

नांदुर घाट | प्रतिनिधी-
येथील सुभाष गुरुलिंग झाडबुके यांच्या घरी रात्री दोनच्या सुमारास पाच ते सहा अज्ञात चोरांनी त्यांच्या घरासमोरील दरवाजावर गावठी दारू टाकून दरवाजा पेटवून दिला सुभाष झाडबुके यांना सासुल ऐकू आल्या नंतर ते जागे झाले आणि त्यांनी घराच्या समोरील दरवाजा उघडला तोच अज्ञात दोन चोर त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी आरडाओरडा केला व त्यांच्या कामावरील गडी पाठीमागचे दरवाजांच्या कड्या लावण्यासाठी तात्काळ पळाले सुभाष झाडबुके हे त्या दोन अज्ञात चोरांच्या अंगावर धावून गेले ते दोन चोर अज्ञात थोडे  पळाल्या सारखे केले बाजूला अंधारामध्ये तीन अज्ञात चोर उभे होते त्या अज्ञात चोरांनी सुभाष झाडबुके यांच्यावर हल्ला चढवला त्यांच्या या धरपकड मध्ये सुभाष झाडबुके यांना दगड काट्यांनी मारहाण केली  त्यामध्ये त्यांना डोक्याला  गंभीर जखम आली तोच आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जागे होतील या भीतीने अज्ञात चोर यांनी पळ काढला त्यांचा चोरीचा डाव फसला  आणि  ते पळाले . सकाळी गावकर्‍यांना  कळताच गावकर्‍यांनी सुभाष झाडबुके यांच्या घरी पाहण्यासाठी गावकरी पोहोचले. या घटनेमुळे नांदुर घाट मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे .नांदूर मध्ये चोरीचे प्रमाण एवढे वाढले आहे की याच्यामध्ये पोलीस प्रशासन चोरांच्या मुसक्या आवळतील का असा प्रश्न नांदूर मधील नागरिकांना होत आहे