Breaking News

पंढरपूरहून परतणार्‍या भाविकांच्या गाडीचा येवल्यात अपघात

येवला/प्रतिनिधी
पंढरपूर वरून परतणार्‍या वारकर्‍यांच्या गाडीला येवल्याजवळ अपघात झाला असून या अपघातात मालेगाव तालुक्यातील 18 जण जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की येवला - नगर - मनमाड महामार्गावर येवल्यानजीक अंचलगाव पाटीजवळ पिंपळगाव जलाल शिवारात पंढरपूरवरुन परतनार्‍या पिकअप गाडीला अपघात झाला. यात 18 भाविक जखमी तर तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. मालेगाव  तालुक्यातील पाळदे येथील वारकरी पंढरपूर येथून दर्शन घेऊन घरी परतत होते. पहाटे पाच वाजेच्या सुमारास पिकअप गाडी (एमएच 4,सीपी 2447) व  मालवाहू ट्रक (केए 25, डी-7808) चा आपघात झाला.ट्रकने पिकअपला धडक दिली.
पीकअपमध्ये 18 वारकरी होते, त्यांपैंकी 8 जखमींना येवला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे जखमीपैकी काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. हे सर्व भाविका मालेगाव तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती असून घरी पोहचण्यास अवघा अर्धा तास उरला असताना अपघात झाल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.