Breaking News

उपकारांच्या आठवणींचा ठेवा म्हणजे पुण्यस्मरण - हभप ढोक

भेंडे/प्रतिनिधी
लोकनेते स्व. मारुतराव घुले यांनी उभारलेल्या उद्योग समुहाला  वाईट नजर लागू नये यासाठी पांडुरंग  चरणी प्रार्थना करतो. समाजातील गोरगरीब व गरजूंना मदतीसाठी केलेले काम व जनमानावर केलेल्या अमर्याद उपकारांच्या आठवणींचा ठेवा म्हणजे पुण्यस्मरण असे प्रतिपादन रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी केले. भेंडा येथील लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटलांच्या १७ व्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनरूपी सेवेत ते बोलत होते.

  याप्रसंगी ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नरेंद्र घुले, माजी आ. पांडुरंग आभंग, माजी आ. चंद्रशेखर घुले, शेवगाव पंचायत समितीचे अध्यक्ष डॉ.क्षितिज घुले, माजी खा. तुकाराम गडाख, भैय्या साहेब देशमुख, काकाभाऊ नरवडे, दिलीप लांडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देसरडा, तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष आंकुश काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष काशिनाथ पाटील नवले, संचालक नारायणराव म्हस्के, माजी जिल्हा परिषदेच्या सदस्य आशा मुरकुटे, संचालिका रत्नमाला नवले, ज्ञानेश्वर कारखान्याचे एम. डी. आनिल शेवाळे, जनरल मँनेंजर काकासाहेब शिंदे, लेबर आँफीसर बाळासाहेब डोहाळे, आँड सुनील शिंदे,आदी मान्यवर उपस्थित होते.

    राम-लक्ष्मणासारखे भावा-भावातील बंधू प्रेम पाहून माय-बापाला आंनद होत असतो. नरेंद्र पाटील व शेखर पाटील ही राम-लक्ष्मणाची जोडी आहे. या जोडीला कोणाची नजर लागू नये.जोडी फोडण्यासाठी कावळ्याच्या जातीचे अनेक लोक टपलेले असतात,त्यापासून जपून रहा असा सल्ला रामराव ढोक महाराज यांनी दिला.