Breaking News

खडसे, महाजनांनी साधला एकमेकांवर निशाणा

जळगाव
लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्व राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजपसह सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जळगावमध्ये भाजप पक्षाची बैठक पार पडली . या बैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. खडसेंच्या टीकास्त्रावर गिरीश महाजन यांनी उत्तर देत, खडसेंना चांगलेच चिमटे काढले. तर गिरीश महाजन म्हणाले भाजप हा तत्व आणि सिद्धांतावर चालणारा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीतील यश संपूर्ण पक्ष संघटनेचे आहे, असे म्हणतांना खडसेंचा मुद्दा खोडून काढला
माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच ठाऊक आहे. तरी पक्षाच्या बैठकीत त्यांच्यातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत भाषणा दरम्यान खडसे आणि महाजनांची चांगलीच जुंपली. दोघांनी एकमेकांचे चिमटे काढले. लोकसभा निवडणूकीचे मूल्यमापन करताना खडसेंनी नरेद्र मोदींवर स्तुती सुमने उधळली. लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाचे मूल्यमापन करताना एकनाथ खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली. तर गिरीश महाजन यांनी भाजप हा तत्त्व आणि सिद्धांतांवर चालणारा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असे सांगत लोकसभा निवडणुकीत निवडणुकीतील यश हे संपूर्ण पक्ष संघटनेचे असल्याचा उल्लेख करत खडसेंचा मुद्दा खोडून काढला. लोकसभा निवडणूकीत मिळालेले माझे किंवा तुमचे नसून सर्वांच्या परिश्रमाचे आहे. परंतु ते एका मंत्र्यांचे किंवा मुख्यमंत्र्यांचे आहे असे आपण मानायला तयार नसल्याचे ते म्हणाले. गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामाचे हे यश आहे, असा उल्लेख खडसेंनी केला. खडसेंनी केलेल्या उल्लेखाचा धागा पकडून गिरीश महाजन आपल्या भाषणात म्हणाले की भाजप हा तत्व आणि सिद्धांतांवर चालणारा पक्ष आहे. भाजप हा पक्ष कोणाची खासगी मालमत्ता नाही. इथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे घराणेशाही चालत नाही. हा पक्ष नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांचा आहे. जोपर्यंत कार्यकर्ता आहे; तोपर्यंत पक्षाला कोणीही मागे खेचू शकत नाही. उद्या मी असेल किंवा नसेल. दुसरे कोणी असेल किंवा नसेल, पण कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष राहणारच आहे. त्यामुळे मी गेलो म्हणजे पक्ष संपला, असे कोणी समजता कामा नये, या शब्दात महाजन यांनी खडसेंना चिमटा काढला.
लोकसभा निवडणुकीत ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे जनतेने भाजपला जिंकून आणले . त्यामुळे लोकसभा उमेदवार निवडून आणण्याचं श्रेय इथं बसलेल्या कुणाचं किंवा मुख्यमंत्र्यांचं नाही’ असा टोला खडसे यांनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला. याअगोदरही खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले. त्यामध्ये अनेकांचे पुरावेही प्रथमदर्शनी हाती आले आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्याचं धाडस सरकार दाखवत नाही; पण नाथाभाऊंवर केवळ आरोप होताच राजीनामा मागण्याचं षड़यंत्र सुरू झालं. यावरून, मला राजकीय  षड़यंत्राचा बळी बनविल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे. खडसे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले होते . त्यानंतर त्यांना भाजप पक्षाने कधीच पुन्हा मंत्रिपद दिले नाही . याचीच खंत खडसेंना असून ते सतत पक्षावर टीका करीत असतात.